ठाणे ते दिवा दरम्यान मेगाब्लॉक, प्रवास करण्यापूर्वी हे वाचाच...

२४ तासाचा विशेष पायाभूत सुविधांसाठीचा मेगाब्लॉक 

Updated: Jan 2, 2022, 08:40 AM IST
ठाणे ते दिवा दरम्यान मेगाब्लॉक, प्रवास करण्यापूर्वी हे वाचाच... title=

मुंबई : पाचव्या सहाव्या मार्गिकेसाठी ठाणे-दिवा दरम्यान 24 तासांचा जम्बो ब्लॉक करण्यात आला आहे. ठाणे ते कल्याण मार्गावर अप आणि डाऊन धीम्या लोकल गाड्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांना प्रवास करण्यापूर्वी ही संपूर्ण माहिती वाचून घ्या. 

ठाणे-दिवा दरम्यान आज तब्बल 24 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्यरात्री 2 वाजल्यापासून मेगाब्लॉक सुरू झाला असून, आज रात्री 2 पर्यंत हा मेगाब्लॉक आहे. ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

यादरम्यान कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकूर्ली अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर लोकल पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर जलद मार्गावरील वाहतूक सुरू राहणाराय...प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष बससेवाही उपलब्ध करण्यात आली आहे. 

मध्य रेल्वेच्या वतीनं आज ठाणे-दिवा दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.  काल मध्यरात्री 2 वाजल्यापासून आज मध्यरात्री 2 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक सुरू झाला आहे. यामुळे संपूर्ण दिवसभर मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे.

ठाणे ते दिवा अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर हा २४ तासाचा विशेष पायाभूत सुविधांसाठीचा ब्लॉक घेतला जात आहे. या ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाही.