मुंबई : Mumbai School Reopening News: कोरोनाचा धोका कमी झाल्याने राज्य सरकारने शाळा सुरु (School Reopening) करण्याचा निर्णय घेतला. (Maharashtra School Reopening News) त्यानुसार 4 ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरु होणार आहे. शहरीभागात इयत्ता 8 वी ते 12 आणि ग्रामीण भागात इयत्ता 5 ते 12 वीपर्यंतच्या शाळा सुरु होणार आहे. दरम्यान, मुंबईत दिवसाआड शाळा भरणार आहे. एका वर्गात फक्त 15 ते 20 विद्यार्थी बसतील, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील शाळा 4 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होतील असे सांगितल्यानंतर काही दिवसांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) बुधवारी एक मोठी घोषणा केली. 8 ऑक्टोबर ते 12 वीच्या शाळा 4 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होतील. BMC आयुक्त इक्बाल चहल म्हणाले की, उर्वरित वर्गांसाठी, नागरी संस्था नोव्हेंबरमध्ये निर्णय घेईल. तथापि, बीएमसीने म्हटले आहे की, सरकारने जारी केलेली कोविड मार्गदर्शक तत्त्वे बीएमसीच्या अखत्यारीतील सर्व शाळांना लागू केली जातील. दरम्यान, आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थी शाळेत येईल, असे त्या म्हणाल्या.
सर्वांचे मत घेतल्यानंतर शाळा सुरू केल्या जात आहेत. मुलांची हजेरी सक्तीची केली जाणार नाही. शाळा व्यवस्थापन समिती पालकांच्या संमतीसाठी अर्ज दिला जाईल. पालकांच्या संमतीपत्रानंतर त्यांच्या मुलांना शाळेत घेतले जाईल. एका बेंचवर एकच मुलगा बसेल. मुलांना मास्क, सॅनिटायझर पालिका देईल. सर्व शिक्षकांचे डोस पूर्ण झालेत. एखाद्या वर्गातील सर्वच मुलांच्या पालकांनी संमती दिल्यास, असे वर्ग अल्टरनेट डे चालवले जातील, असे महापौर पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबईत एकूण 29 मुलांना कोरोनाची लागण झालीय. यात केईएमचे 23 विद्यार्थी आहेत. ऊर्वरीत विद्यार्थी हे इतर मेडिकल कॉलजचे आहेत. सौम्य लक्षणे असलेल्यांना क्वारंटाईन केले आहे. तर लक्षणे असणाऱ्यांना अॅडमिट केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम घेतल्याचे समजत आहे.