मुंबई : मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्यासंदर्भात आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांचे वकील आज बाजू मांडणार आहेत. त्यानंतर निकाल दिला जाईल. गेल्या सुनावणीवेळी मराठा समाज किती प्रगत आहे आणि राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाज किती सक्षम आहे यावर मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांनी मुद्दे मांडले.
आज मुकूल रोहोतगी, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडतील. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सुनावणी संपणार आहे. त्यानंतर अंतरिम आदेशासाठी तारीख निश्चीत केली जाण्याची शक्यता आहे.
याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूनी युक्तीवाद झाला आहे. त्याचप्रमाणे विरोधकांकडून ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा, मेगाभारतीचा मुद्दा घेतला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून परिपत्रक काढण्यात आलं आहे. कुठल्याही परिस्थितीत कोणतीही नोकर भरती राज्यात होणार नाही.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर २७ सप्टेंबर व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी झाली. पाच न्यायाधीशांच्या खंठपीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी यावेळी केली असून व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे म्हणणं मांडण्यास अडचणी येत असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. तसेच सुनावणीपर्यंत नोकर भरतीला स्थगिती दिली असून याचिकांवर १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय आज घेतला आहे.