आताची मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांची नोटीस, 'या' ठिकाणी आंदोलनाची परवानगी नाही

Maratha Reservation Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मु्ंबईत धडक देणार आहे. मुंबईच्या वेशीवर येण्याआधीच मुंबई  पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

कृष्णात पाटील | Updated: Jan 25, 2024, 03:58 PM IST
आताची मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांची नोटीस, 'या' ठिकाणी आंदोलनाची परवानगी नाही title=

Maratha Reservation Andolan Latest News : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा वादळ मुंबईत धडकणार आहे. त्याआधीच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने (Mumbai Highcourt) मुंबई पोलिसांना नोटीस पाठवली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशामुसार मुंबई पोलिसांना जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. आझाद मैदान (Azad Maidan) किंवा शिवाजी पार्क मैदानात (Shivaji Park) आंदोलनासाठी परवानगी नसल्याचा उल्लेख या नोटीशीत करण्यात आली आहे. याऐवज खारघर इथल्या मैदानात आंदोलन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यावर मराठा समाजातर्फे एडव्होकेट सतिश मानेशिंदे मुंबई पोलिसांच्या नोटीसाला कायदेशीर उत्तर देणार आहेत.

एकीकडं मुंबई पोलीस नोटीसीत आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नसल्याचे म्हणत असले तरी दुसरीकडे स्टेज बांधणीचा शुभारंभ कररण्यात आलाय. मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनासाठी हे स्टेज बांधले जातंय.

मराठ्यांचा मोर्चा जसजसा मुंबईकडे कूच करतोय तशी सरकारची धावाधाव सुरू झालीय..सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यात दाखल झालं असून मनोज जरांगेंशी चर्चा करण्यात येत आहे. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दाड हे चर्चा करत आहेत. या चर्चेतून तोडगा न निघाल्यात लोणावळ्यातून मुंबईकडे कूच करणारच असा निर्धार जरांगेंनी पुन्हा  बोलून दाखवलाय. त्य़ामुळे आता या चर्चेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिष्टमंडळ तोडगा काढण्यात अयशस्वी झालं तर जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हीसीवरून जरांगेंशी चर्चा करणार आहेत. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघालाय. आता हा मोर्चा लोणावळ्यात आहे...सध्या सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंशी चर्चा करतंय. यानंतर शिंदे जरांगेंशी चर्चा करणार आहेत...कुणबी दाखले मिळालेल्यांना प्रमाणपत्र द्या, सगे सोय-यांनाही प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंची आहे...त्यामुळे शिंदे-जरांगेंच्या चर्चेत आरक्षणावर काय तोडगा निघणार याकडे लक्ष लागलंय.

आंदोलन शांततेत करा, कुणीही उद्रेक, जाळपोळ करू नका. गालबोट लावणा-यांना पोलिसांच्या ताब्यात द्या असं आवाहन जरांगेंनी मराठा आंदोलकांना केलंय, शांततेत आरक्षण मिळवून इतिहास घडवायचाय. त्यामुळे स्वत:च स्वयंसेवक बनून आपल्या माता भगिनींचं संरक्षण करा...असं आवाहन जरांगेंनी केलंय.

मराठा बांधव मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत...त्याच्या राहण्याची सोय एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आलीय...दोन लाख पेक्षा जास्त आंदोलकांची राहण्याची आणि खाण्याची सोय इथे करण्यात आलीय...कांदा बटाटा मार्केटमध्ये महिलांना राहण्याची सोय करण्यात आलीय...हा मोर्चा नवी मुंबईतील पामबीच रोड मार्गाने एपीएमसीमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदेंनी दिलीय...