मनोज पाटीलच्या कुटुंबाची राज ठाकरेंकडे न्याय मिळवून देण्याची मागणी

मिस्टर इंडिया मनोज पाटील याने सिनेकलाकार साहिल खान यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 

Updated: Sep 19, 2021, 02:35 PM IST
 मनोज पाटीलच्या कुटुंबाची राज ठाकरेंकडे न्याय मिळवून देण्याची मागणी title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई ​ : मिस्टर इंडिया मनोज पाटील याने सिनेकलाकार साहिल खान यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी मनोज पाटील यांच्या कुटूंबियांनी मनसेकडे धाव घेतली आहे. मनसे मनोज पाटील यांच्या पाठीशी ठाम पणे उभी आहे असं आश्वासन मनसे नेत्यांकडून देण्यात आले आहे.

मनोज पाटील या मराठी मुलाच्या मागे मनसे ठाम पणे उभी आहे. अतिशय कष्टातून मनोज पाटीलने आपले करिअर आंतर राष्ट्रीय पातळीवर बनवले आहे. त्याच्यावर एवढं दडपण आणलं गेलं की त्याला आत्महतेस भाग पाडलं गेलं. मराठी मूल व्यवसायात मोठी होतायत आणि हे इतर बाहेर आलेले त्यांच्यावर दडपण आणतायत.
साहिल खान वर गुन्हा दाखल झाला आहे त्याला अटक झाली पाहिजे. साहिल खान ला मनसे स्टाइलने एक झलख दाखवली आहे पुढे महाराष्ट्रात तो काय करतो हे आम्ही बघू असं मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

मनोजचे वडील धोंडिबा पाटील यांनी माझ्या मुलाला न्याय मिळावा मनसेने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहेत. राज ठाकरे यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा असं त्यांनी म्हटलं आहे.

मिस्टर इंडिया मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खान चांगलाच चर्चेत आला आहे.  मनोजच्या सुसाईड नोटमध्ये साहिल आत्महत्येसाठी दोषी असल्याचं म्हटलं आहे. मनोजने 2016 मध्ये मिस्टर इंडियाचे विजेतेपद पटकावले आहे.