सिंदिया इमारतीला आग, अग्निशमनदलाच्या 8 गाड्या घटनास्थळी

 पावणे पाचच्या सुमारास ही आग लागली 

मुंबई : मुंबईतील सिंदिया इमारतीला आग लागली आहे. पावणे पाचच्या सुमारास ही आग लागली आहे. 6 मजल्याच्या इमारत असून तिसऱ्या आणि चौथ्या इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. 

या इमारतीला लागलेली आग मोठी असल्यामुळे संपूर्ण इमारत यामध्ये ओढली गेली. या इमारतीत 5 ते 6 जण असल्याचं अग्निशमनदलाने सांगितलं. ही लोकं इमारतीच्या टेरेसवर अडकले होते. त्यांना अग्निशमनदलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कमर्शिअल असलेल्या या इमारतीचं नुकसान झालं आहे. सिंदिया इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या माळ्यावर लागली आग. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याच इमारतीत आयकर विभागाच्या तपास शाखेच कार्यालय आहे. या आगीत तिस-या मजल्यावरील आयकर खात्याच्या कार्यालयाच चांगलच नुकसान झालं असून, महत्वाच्या केसेसे ची कागदपत्रे नष्ट झाल्याची भिती वर्तवली जात आहे.