MVA Protest March on 17 Dec : महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, तसंच महागाई, बेरोजगारी आणि सीमावादाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadhi) 17 डिसेंबरला मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या निमित्ताने आज ठाकरे गट (Thackeray Group), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले अजित पवार
17 डिसेंबरला हल्लाबोल मोर्चा आहे, राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांबरोबरच काही स्वयंसेवी संस्थाही या मोर्चात सहभागी होत आहेत. गेल्या सहा महिन्यात महापुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव करण्याचं काम,अपशब्द वापरण्याचं काम सुरु आहे. लोकांमध्ये असंतोष आहे त्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे. सीमीप्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज, फुले-आंबेडकर या महापुरुषांबद्दल जे अपशब्द वापरले गेले आहेत, त्या गोष्टीचा धिक्कार करण्याकरता, त्या लोकांना बाजूला काढण्याकरता हा मोर्चा काढण्यात येणार आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय.
मुंबईतून मोठया प्रमाणावर नागरिक या मोर्चात सहभागी होतील, पक्ष सहभागी होतील, याशिवाय महागाई, बेरोजगारी आणि सीमावादाचा प्रश्न हे मुद्दे देखील प्रामुख्याने असतील. विरोधी पक्षांनी सामंजस्य भूमिका घेतली आहे, अनेक राजकीय पक्ष त्यात सहभागी झालेले आहेत, कुठेही विध्वंसक हा मोर्चा होणार नाही, अतिशय शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला जाईल, मोर्चासाठी परवानगी मागितली आहे, पण अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही, पण ती मिळेल असा आम्हाला विश्वास आहे असंही अजित पवार यांनी सांगितलं.
हे ही वाचा : तर आमचाही मनसुख हिरेन झाला असता... क्लीन चीट मिळाल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया
सीमाप्रश्नावर आमची सामंजस्याची भूमिका
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमावादावार विरोधकांनी सामंजस्याने भूमिका घेण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नाव घेतलं. मुळात आम्ही आधीपासूनच सामंजस्याची भूमिका घेतली आहे. आम्हाला यात राजकारण करायचं नाहीए असं अजित पवार यांनी सांगितलं.