Maharastra Cabinet Full List : कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती? संपूर्ण मंत्रिमंडळ एका क्लिकवर

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर..अजित पवारांकडे अर्थ खातं...सत्तारांचं कृषी खातंही राष्ट्रवादीला तर महत्त्वाची खाती राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश...

राजीव कासले | Updated: Jul 14, 2023, 05:49 PM IST
Maharastra Cabinet Full List : कोणत्या मंत्र्याकडे कोणती खाती? संपूर्ण मंत्रिमंडळ एका क्लिकवर title=

Maharastra Cabinet Full List : महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील मंत्र्यांचं खातेवाटप (Portfolio) अखेर झालंय.  राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या (NCP) मंत्र्यांच्या शपथविधीनंतर तब्बल 12 दिवसांनी खातेवाटप जाहीर झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेच पुन्हा एकदा अर्थमंत्री झालेत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे आल्या आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसनं अर्थ आणि सहकारसह महत्त्वाची खाती पदरात पाडून घेतली. भाजपकडील (BJP) 6 तर शिवसेनेकडील (Shivsena) 3 खाती राष्ट्रवादीच्या पदरात पडली आहेत. नव्या खातेवाटपानुसार शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांचं कृषी खातं काढून ते धनंजय मुंडे यांना देण्यात आलंय. तर भाजपच्या अतुल सावेंचं सहकार खातं दिलीप वळसे पाटलांना देण्यात आलं असून सावेंना आता गृहनिर्माण खातं देण्यात आलीय. तर मंगलप्रभात लोढा यांचं पर्यटन खातं काढून ते गिरीश महाजन यांना देण्यात आलंय. तर गिरीश महाजन यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांना देण्यात आलंय. 

आपण एक नजर टाकूया संपूर्ण मंत्रीमंडळावर

मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे - सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म

देवेंद्र गंगाधर फडणवीस - गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार

अजित अनंतराव पवार - वित्त व नियोजन

छगन चंद्रकांत भुजबळ - अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील - सहकार

राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय

हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य

चंद्रकांत बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये

विजयकुमार कृष्णराव गावित - आदिवासी विकास

गिरीश महाजन - ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव रघुनाथ पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता

दादा दगडू भूसे - सार्वजनिक बांधकाम

संजय दुलीचंद राठोड - मृद व जलसंधारण

धनंजय पंडीतराव मुंडे - कृषी

सुरेश दगडू खाडे - कामगार

संदीप आसाराम भूमरे - सोजगार हमी योजना, फलोत्पादन

उदय रविंद्र सामंत - उद्योग

तानाजी जयवंत सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रविंद्र दत्तात्रय चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

अब्दूल सत्तार - अल्पसंख्याक विकास व औकाप, पणन

दिपक वसंतराव केसरकर - शालेय शिक्षण, मराठी भाषा

धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम - अन्न व औषध प्रशासन

अतुल मोरेश्वर सावे - गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण

शंभूराज शिवाजीराव देसाई - राज्य उत्पादन शुल्क

आदिती सुनिल तटकरे  -  महिला व बालकल्याण

संजय बाबुराव बनसोडे - क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

मंगलप्रभात लोढा - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता

अनिल पाटील - मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन