राज्यातल्या शिक्षकांसाठी फडणवीस सरकारकडून महत्त्वाची बातमी...

या कामगिरीसोबतच शिक्षकांचीही हजेरी घेतली जाणार असून ऑनलाईन यांची नोंद होणार आहे

Updated: Jun 7, 2019, 03:55 PM IST
राज्यातल्या शिक्षकांसाठी फडणवीस सरकारकडून महत्त्वाची बातमी... title=

मुंबई : राज्यातल्या शिक्षकांची बढती आणि पगारवाढ आता त्यांच्या कामगिरीवर ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कोणत्या शाळेचे शिक्षक प्रयोगशील काम करतात? कोणत्या शाळेचा निकाल किती आहे?  विद्यार्थी इतर परीक्षांमध्ये सहभाग घेतायत? यावर शिक्षकांच्या कामाचं मूल्यमापन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या सगळ्याची माहिती ऑनलाईन करण्याबाबत शिक्षण विभाग विचार करत आहे. याचे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याची जबाबदारी राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर देण्यात आलेली आहे. 

या कामगिरीसोबतच शिक्षकांचीही हजेरी घेतली जाणार असून ऑनलाईन यांची नोंद होणार आहे. 

दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्व आणि रिक्त पदं भरण्याचे दिलेले आदेश याची अंमलबजावणी झाली तर उच्च शिक्षण क्षेत्रातील सुमारे ११ हजार सहाय्यक शिक्षकांची पदं भरली जाण्याची शक्यता आहे.