मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल, असा विश्वास सेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी पुन्हा एकदा व्यक्त केला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसेनेची आणि जनतेची इच्छा आहे. संसदेतील शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षासोबत बसतील, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. शिवसेनेने एनडीएसोबत आपली साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह पक्ष महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करीत असताना शिवसेनेचे हे विधान अशा वेळी आले आहे. महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. शिवसेना-राष्ट्रवादीचे नेते राज्यात सरकार स्थापनेचा दावा करीत आहेत.
या दरम्यान राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला. ते म्हणाले, एनडीए ही कोणत्याही एका पक्षाची मालमत्ता नाही. एकाही पक्षाची स्थापना एनडीएने केली नव्हती, अनेकजण एनडीएमध्ये भरती सहभागी झाले आहेत. काही आले आणि काही बाहेर पडलेत. त्यांनी भाजपचे नाव न घेता टीका केली. आम्ही एनडीए बनवली होती. बाळासाहेब, अटलजी, अडवाणीजी आणि प्रकाशसिंग बादलजी यांची एनडीए होती. मागील एनडीए आणि आजच्या एनडीएमध्ये जमीनआसमानचा फरक आहे. मला माहीत नाही, आता एनडीएचा संयोजक कोण आहे? आज आम्हाला समजले आहे की, सभागृहात शिवसेनेच्या बसण्याची व्यवस्था बदलण्यात आली आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करणयाची तयारी केली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे. तिन्ही राजकीय पक्षांनी एक समान कार्यक्रम तयार केला आहे. त्यावर चर्चाही झाली आहे. आता अंतिम स्वरुप येण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची भेट होणार आहे. त्यानंतर सरकार स्थापन होण्याची हालचाल सुरु होण्याची शक्यता आहे.