मुंबई : मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकावर एक गर्भवती महिला आपल्या लहान मुलासह चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. हे पाहून घटनास्थळी तैनात असलेले आरपीएफचे कॉन्स्टेबल अशोक यादव यांनी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्या महिलेचा जीव वाचवला. या महिलेने आरपीएफ कॉन्स्टेबलकडे स्वतःचे आणि आपल्या मुलांचा जीव वाचवल्याबद्दल मनापासून आभार मानले आहे.
ही घटना दादर रेल्वे स्टेशनची आहे. जिथे घटनास्थळावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा सगळा प्रकार रेकॅार्ड झाला आहे. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर सीएसएमटी-दानापूर स्पेशल ट्रेन सुरु झाली तेव्हा एका गर्भवती महिला आपल्या मुलासह ट्रेनमध्ये चढण्यासाठी धावू लागली. यावेळी, तिचा पाय घसरला आणि तिचा तोल जाऊन ती प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणारच होती की, त्यावेळी घटनास्थळी ड्युटीवर तैनात असलेल्या आरपीएफ जवान अशोक यादव यांनी पळत त्यांना मागे खेचले ज्यामुळे त्या दोघांचेही प्राण वाचले.
Quick reaction and immediate action by RPF staff Dadar, Mumbai Division Central Rly saved life of a pregnant woman and her 2 years child @Central_Railway @fpjindia @rpfcr pic.twitter.com/TWMQH9dRJE
— SwapnilRM (@srmishra319) May 4, 2021
त्या महिलेचे नाव शोभा आहे आणि ती मूळची नालंदा बिहारची आहे. ती या ट्रेनने दानापूरला जात होती. परंतु तिला पोहचायला थोडा उशीर झाला, ज्यामुळे तिला धावून ती ट्रेन पकडल्या शिवाय पर्याय नव्हता. ज्यामुळे हा सगळा प्रकार घडला. आपला जीव वाचविल्याबद्दल महिलेने आरपीएफ कॉन्स्टेबल अशोक यादव यांचे आभार मानले आहेत. या शौर्याबद्दल पोलिस खात्यातर्फे अशोक यादव यांनाही सन्मानित करण्यात येणार असल्याचे एका आरपीएफ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 2 कोटी 83 लाख 84 हजार 582 लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यापैकी 48 लाख 80 हजार 542 रीपोर्ट पॅाझिटिव्ह आढळले आहेत. म्हणजेच, एकूण चाचणींपैकी 17.19% कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे.