मुंबई : बंडखोरांना आता भगवा सोडून पळावं लागेल. या बंडखोरांनी स्वत:हूनच परतीची दारं बंद करुन घेतली आहेत. आता कायदेशीर लढाई सुरु झाली आहे, असा इशारा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी बैठकीनंतर दिला आहे. (maharashtra political crisis action will be taken against rebel mlas says shiv sena mp arvind sawant)
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांच्यात तब्बल साडे तीन तास बैठक झाली. या बैठकीनंतर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
"बंडखोर आमदार कायद्याच्या कचाट्यात सापडलेत. बंडखोरांना घातपात झालं की कळेल. 4 दिवसात बंडखोरांवर कारवाई होईल", असं सावंत यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं. ते माध्यमांशी बोलत होते.
यासह बंडखोर आमदारांना त्यांची बाडू मांडण्याची संधी दिली जाणार असल्याचंही सावंत यांनी नमूद केलं.