Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीची जाहीरात प्रसिद्ध होण्याआधीच ब्रेक

या पोलीस भरतीची जाहीरात (Maharashtra Police Recruitment) 1 नोव्हेंबरला जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्यात येणार होती.   

संजय पाटील | Updated: Oct 29, 2022, 05:41 PM IST
Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीची जाहीरात प्रसिद्ध होण्याआधीच ब्रेक title=

मुंबई : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रात पोलिसांची 20 हजार पदं भरण्यात (Maharashtra Police Recruitment) येणार असल्याची माहिती दिली. या 20 हजार जागांपैकी आर्थिक राजधानी मुंबईत 6 हजार 740 पदं रिक्त आहेत. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण 14 हजार 956 जागा रिक्त आहेत. या पोलीस भरतीची जाहीरात 1 नोव्हेंबरला जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्यामुळे पोलीस भरतीकडे डोळे लावून बसलेल्या तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. मात्र या तरुणांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. 

पोलीस भरतीची जिल्हानिहाय जाहीरात प्रसिद्ध होण्याआधीच या भरतीला स्थगिती देण्यात आली आहे.  काही प्रशासकीय कारणास्तव पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे ही नियोजित पोलीस भरती 2021 सालची आहे. आधीच या भरतीला उशीर झालाय. त्यात आता भरतीला स्थगिती दिली आहे. यामुळे तरुणांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

भरतीत असं होतं प्रवर्गनिहाय आरक्षण

अनुसूचित जाती - 1811
अनुसूचित जमाती - 1350
विमुक्त जाती (अ) - 426
भटक्या जमाती (ब) - 374
भटक्या जमाती (क) -473
भटक्या जमाती (ड) - 292
विमुक्त मागास प्रवर्ग - 292
इतर मागास वर्ग - 2926
इडब्लूएस - 1544
खुला - 5468 जागा
एकूण - 14956)