Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Wife) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असतात.

Updated: Oct 31, 2022, 10:40 PM IST
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय title=

मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Wife) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असतात. आपल्या गाण्यांमुळे तसेच महाविकास आघाडीवर (Mva) टीकेमुळे त्या कायम सक्रीय असतात. या अमृता फडणवीस यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. (maharashtra government increased devendra fadnavis wife amruta fadnavis security)

राज्य सरकारकडून मिसेस फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अमृता फडणवीस यांना आधी X दर्जाची सुरक्षा होती. यात वाढ करुन की ती  आता  Y+ दर्जाची करण्यात आली आहेत. आधी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस तैनात होता. मात्र आता सुरक्षेत वाढ झाल्यानं 4 पोलीस सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. 

अमृता फडणवीस यांनी आतापर्यंत गायलेली गाणी

श्रीलंकन गायिका योहानी (Yohani) दिलोका डी सिल्वाने गायलेल्या 'मानिके मागे हिते' या गाण्यावर आधारित ‘मन ही मन तुझे चाहा…’ 

‘अलग मेरा ये रंग है’

'गणेश वंदना' 

"तिला जगू द्या..."

‘तू मंदिर, तू शिवाला’