ओबीसी समाजासाठी ७०० कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर

ओबीसी समाजाला खूश करण्यासाठी सरकारची घोषणा

Updated: Jan 15, 2019, 02:07 PM IST
ओबीसी समाजासाठी ७०० कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर title=

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनंही नव्या योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये ओबीसी समाजासाठी ७०० कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. मराठा समाजाच्या पाठोपाठ दलित समाजाच्या योजनेच्या घोषणा केल्यानंतर ओबीसी समाजातून नाराजीचा सूर वाढला होता. ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी ७०० कोटींच्या योजनेच्या आज घोषणा करण्यात आल्या. ओबीसी महामंडळाला २५० कोटी, भटक्या - विमुक्त महामंडळाला ३०० कोटी, तर पहिल्यांदाच वडार आणि रामोशी समाजासाठी विशेष पॅकेज देण्यात आलं आहे. आज कॅबिनेटमध्ये या विविध योजनांना मान्यता देण्यात आली आहे.