मंत्री नवाब मलिक यांचे खळबळजनक ट्विट, 'गांधी गोऱ्यांशी लढले, आम्हीही चोरांशी लढू'

Nawab Malik Tweet :  मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटची जोरदार चर्चा सुरु  झाली आहे. 

Updated: Dec 11, 2021, 10:17 AM IST
मंत्री नवाब मलिक यांचे खळबळजनक ट्विट, 'गांधी गोऱ्यांशी लढले, आम्हीही चोरांशी लढू' title=
संग्रहित छाया

मुंबई :  Nawab Malik Tweet : महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटची जोरदार चर्चा सुरु  झाली आहे. मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटने त्यांच्या घरी छापा पडण्याचे संकेत मिळत आहेत. (Maha Vikas Aghadi government Minister Nawab Malik Tweet )

 माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. आपण पाहुण्यांचे स्वागत करू, घाबरणार नाही, असे मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे. या त्यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण आले आहे. माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत. आम्ही या सरकारी पाहुण्यांचे स्वागतच करू, घाबरणे म्हणजे रोज रोज मरणं असतं, आम्ही घाबरणार नाही, आम्हाला लढायचे आहे. गांधी गोऱ्यांशी लढले, आम्हीही चोरांशी लढू, असे मलिक यांनी म्हटले आहे.

त्यांनी काय केलेय ट्विट 

साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से.

 

मलिक यांनी मागितली माफी

दरम्यान, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात माफी मागितली आहे. न्यायालयात हमी देऊनही समीर वानखेडे यांच्याबाबत वक्तव्य केल्याबद्दल खेद व्यक्त करतो, असे वकीलांमार्फत मलिक यांनी न्यायालयाला सांगितले. 3 आणि 6 डिसेंबरला मलिकांनी वानखेडे यांच्यावर टीका केली होती. कारवाई का करू नये, अशी विचारणा न्यायालयाने केली होती.