Maha Student App बोगस पटसंख्येला आळा बसण्यासाठी शिक्षण विभागाचा मास्टर प्लॅन

सध्या राज्यातील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची उपस्थिती व्यवस्थित नोंदवली जावी म्हणून शालेय शिक्षण विभागाने महा स्टुडंट ऍप (maha student app) तयार केले आहे. 

Updated: Nov 13, 2021, 10:01 AM IST
Maha Student App बोगस पटसंख्येला आळा बसण्यासाठी शिक्षण विभागाचा मास्टर प्लॅन title=

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागातर्फे नेहमीच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. सध्या राज्यातील विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची उपस्थिती व्यवस्थित नोंदवली जावी म्हणून शालेय शिक्षण विभागाने महा स्टुडंट ऍप (maha student app) तयार केले आहे. लवकच हे ऍप राज्यातील सर्व शाळांमध्ये लागू करण्यात येणार आहे.

सध्या शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची बायोमॅट्रिक हजेरी घेतली जात आहे. यापुढे अचुक आणि योग्य माहिती मिळावी यासाठी महा स्टुडंट ऍपद्वारे उपस्थितीची नोंदणी केली जाणार आहे. या ऍपच्या माध्यमातून माहिती सतत अपडेट केली जाणार आहे.

Maha Student App च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उपस्थितीची योग्य माहिती त्वरीत नोंदवली जाणार आहे. या माहितीमुळे शालेय पोषण आहार सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत आहे की नाही. 

याबाबत पारदर्शकता येणार आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी बनावट नोंदणी केली जाते. या ऍपच्या माध्यमातून पारदर्शक उपस्थिती दिसून येणार आहे.

ऍपच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या बनावट नोंदी, तसेच शाळामध्ये अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांवरही चाप बसू शकतो.