रश्मी पाटणकर ते रश्मी ठाकरे.. 'अशी' आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची लव्ह स्टोरी

शिवसेनेच्या कसोटीच्या काळात उद्धव ठाकरेंना रश्मी ठाकरेंची मोलाची साथ मिळतेय. कठीण काळात रश्मी ठाकरे उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून लढतायत

Updated: Oct 5, 2022, 02:42 PM IST
रश्मी पाटणकर ते रश्मी ठाकरे.. 'अशी' आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची लव्ह स्टोरी title=

Rasmi Thackeray : प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं बोललं जातं. कठीण परिस्थितीत घरातील स्त्रीच हीच पुढाकार घेत संपूर्ण कुटुंबाला कठीण परिस्थितून बाहेर काढते. ठाकरेंच्या शिवसेना कुटुंबासाठी आणि ठाकरेंच्या घराण्यासाठीही सध्याचा काळ परीक्षेचा आहे. सध्या ठाकरेंची अस्तित्वाची लढाई सुरु असल्याचं पाहायला मिळतेय. याला कारण आहे त्यांच्याच शिवसेना कुटुंबात पडलेली उभी फूट. एकनाथ शिंदे यांचं बंड आणि पक्षावर ठोकलेला दावा यामुळे ठाकरे ब्रँडवर टांगती तालावर आले. अशात आता ठाकरे घराण्याती रश्मी ठाकरे यांचा विविध मंचावरील वाढत प्रेझेन्स अनेक गोष्टी सांगू पाहतोय का? हे येणार काळ ठरवेल. 

रश्मी ठाकरे करणार शिवतीर्थावर भाषण?

शिवसेनेचा दसरा मेळावा सुरु झाल्यापासून आतापर्यंत ठाकरे घराण्यातील कोणत्याही महिलेने दसरा मेळाव्याला शिवतीर्थावरून भाषण केलेलं नाही. मात्र ज्या प्रकारे रश्मी ठाकरे सध्या राजकीय राजकारणात सक्रिय होताना पाहायला मिळतात. रश्मी ठाकरे यांनी शिवसेनेतील अनेक चाड उतार अत्यंत जवळून पहिले आहेत अनुभवले आहेत. अशात आज दसरा मेळाव्याच्या मंचावरून रश्मी ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची लव्ह स्टोरी 

शिवसेनेच्या कसोटीच्या काळात उद्धव ठाकरेंना रश्मी ठाकरेंची मोलाची साथ मिळतेय. कठीण काळात रश्मी ठाकरे उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून लढतायत. पण तुम्हाला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची लव्ह स्टोरी माहितीय? रश्मी ठाकरे यांचा जन्म डोंबिवलीतील एका मध्यमवर्गीय घरात झाला. रश्मी ठाकरे यांचं पूर्वाश्रमीचं नाव रश्मी पाटणकर होतं. 1987 मध्ये रश्मी ठाकरे LIC मध्ये नोकरी करायच्या. तिथेच राज ठाकरेंची बहीण जयवंती यांच्याशी रश्मी ठाकरेंची भेट झाली. पुढे जयवंती ठाकरेंनीच रश्मी आणि उद्धव ठाकरेंची भेट घडवून आणली. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या ओळखीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंना भेटायला डोंबिवलीला जायचे. 13 डिसेंबर 1989 ला दोघांचं लग्न झालं. शिवसेना पक्षप्रमुख झाल्यापासून उद्धव ठाकरेंनी अनेक कसोटीचे क्षण अनुभवले. प्रत्येक प्रसंगी उद्धव ठाकरेंना रश्मी ठाकरेंची खंबीर साथ आहे.