मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, लसीकरणाचा वेग आपण वाढवतोय. पण किमान आठ दिवस कडक निर्बंध लावू. सर्वानुमते सांगा काय निर्णय घ्यायचा. माझे प्रामाणिक मत कडक लॉकडाऊनचे आहे. मी एक किंवा दोन महिन्यांचा लॉकडाउन म्हणत नाहीये असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
'चर्चेतून कडक निर्बंध आणि सूट असा विषय समोर आला आहे. पण आपल्याला काय परवडेल. आपल्याला लढायचं असेल तर थोडा काळ कळ सोसली पाहिजे. मी असं म्हणत नाही की एक किंवा दोन महिने'
राज्यात कोरोनाची स्थिती बिकट होत असताना मुख्यमंत्र्यांनी आज लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत हे मत मांडलं आहे. यावर अनेक नेत्यांनी ही पाठिंबा दर्शवला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'आपण एक प्लॅन तयार करा आणि लोकांसमोर मांडा. लोकांचा उद्रेक होईल. त्यांना मदत मिळणार की नाही हे समजू द्या.'
फडणवीसांच्या सूचनेवर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, प्लॅन तयार करायला एक दोन दिवस लागतील. पण तो पर्यंत काय करायचे. काही लोकं गैरसमज पसरवत आहेत. कोरोना हा रोग नाही असे सांगत आहेत. लाट थोपवयाची असेल तर कडक निर्बंध गरजेचे असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी नोंदवलं आहे.
संबंधित बातमी : मुख्यमंत्री महोदय आपण निर्णय घ्या, त्याला आमचा पाठिंबा असेल - अजित पवार