अंधेरीच्या इमारतीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद

मुंबईतल्या सिमेंटच्या जंगलात शिरलेल्या बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे. 

Updated: Dec 10, 2017, 08:18 PM IST
अंधेरीच्या इमारतीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद  title=

मुंबई : मुंबईतल्या सिमेंटच्या जंगलात शिरलेल्या बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे. अंधेरी पूर्वेतल्या शेरे पंजाब कॉलनीतल्या एका इमारतीत सकाळीच बिबट्या घुसला होता. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. काही तासांच्या चिवट प्रयत्नांनंतर अखेर बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलं.