मुंबई : पुणे जिल्ह्यातील लवासा प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढण्यात आली आहे. लवासा प्रकल्पाविरोधात करण्यात आलेले आरोप योग्य आहेत. असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
'लवासा प्रकल्पाप्रकरणी झालेले आरोप योग्य आहेत. परंतु आता बराच उशिर झालाय. सध्याच्या स्थितीत तिथलं प्रचंड बांधकाम पाडण्याचे निर्देश देता येणार नाहीत', असं निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला.
खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना लवासा प्रकल्पात स्वारस्य होतं, असं निरीक्षणही कोर्टानं नोंदवलं. या प्रकल्पासाठी कोणतंही टेंडर काढण्यात आलं नव्हतं, हा आरोपही कोर्टानं मान्य केला. मात्र आता उशिर झाल्याचं सांगत याचिका निकाली काढली.