कुर्ल्यात कोरोनाचा धोका वाढला; पालिकेकडून 'हा' परिसर सील

कसाईवाड्यात आतापर्यंत 70हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Updated: May 16, 2020, 07:59 PM IST
कुर्ल्यात कोरोनाचा धोका वाढला; पालिकेकडून 'हा' परिसर सील title=
फोटो सौजन्य : कृष्णात पाटील

मुंबई : देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत. आतापर्यंत मुंबईत 17 हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळले असून 665 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील अनेक भाग कंन्टेंन्मेट झोन जाहीर करण्यात आले असून तिथे कठोर नियमांचं पालन करण्यात येत आहे. आता कुर्ला पूर्व येथील कसाईवाडा पूर्णत: सील करण्यात आला आहे. कसाईवाड्यात कोरोनाचा धोका वाढत असतानाही लोकांमध्ये गांभीर्य नसल्याने अखेर पालिकेने हा विभाग सील करण्याचा निर्णय घेतला.

कसाईवाड्यात जाण्या-येण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. रविवारपासून या भागात प्रत्येक घरी जावून लोकांचं स्क्रिनिंग केलं जाणार आहे.

कसाईवाड्याची लोकसंख्या जवळपास 75 हजारच्या आसपास आहे. कसाईवाड्यात आतापर्यंत 70हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन असतानाही लोक बाहेर फिरत असल्याने, मुंबई महापालिकेच्या एल विभागाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

'जून अखेरपर्यंत...' कोरोनाबाबत आरोग्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती

 

दरम्यान, शनिवारी धारावीत नव्या 53 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे धारावीत आतापर्यंत 1198 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. धारावीत आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे. 

दादरमध्ये शनिवारी 4 तर माहिममध्ये 11 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दादरमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या 154 इतकी झाली. तर माहिममध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 187 इतका झाला आहे.

'माझा मुलगा अपंग आहे, मला बरेलीला जायचेय; माफ करा तुमची सायकल चोरतोय'

 

साहेबांनी 'कुक्कुटपालना'साठीही केंद्राला उपाययोजना सुचवल्यात; रोहित पवारांचा राणेंना टोला