Gold-Silver Rate | सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर

सोने खरेदी  (Gold Price on 5 August 2021) करण्याची 'सुवर्ण'संधी,जाणून घ्या नवे दर... 

Updated: Aug 5, 2021, 06:07 PM IST
Gold-Silver Rate | सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर title=

मुंबई : सोने (Gold Price) आणि चांदी खरेदी करण्याच्या बेतात असणाऱ्यांसाठी गूड न्यूज आहे. सोन्याच्या (Gold-Silver Price Today) प्रति 10 ग्रॅमच्या दरात घसरण झाली आहे. ग्लोबल संकेतांनुसार गुरुवारी दिल्ली  सराफा बाजारात 10 ग्राम सोन्याच्या दरात 312 रुपयांनी घट झाली. तर चांदी प्रति किलोमध्ये 1 हजार 37 रुपयांनी घट झाली आहे. HDFC सिक्योरिटीजनुसार, जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम हा देशांतर्गत बाजारावर झाला, यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली. गुरुवारी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याच्या दरात 321 रुपयांनी घट झाली. त्यामुळे सोन्याचं प्रति 10 तोळ्याचे दर हे 46 हजार 907 रुपये इतके झाले आहे. (know today 5 august 2021 gold  silver rate mumbai pune with delhi) 

चांदीचे दर किती? (Silver Price)

दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरातही मोठी घसरण झालीय. चांदीच्या एक किलोच्या दरात 1 हजार 37 रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचे प्रति किलोचे दर हे  66 हजार 128 रुपये इतके आहे. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये चांदीचे प्रति किलोचे दर हे 67 हजार 165 रुपयांवर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा व्यवहार हा 1 हजार 810 डॉलर प्रति औस इतका होता. तर चांदी 25.37 डॉलर प्रति औंसावर ट्रेड करत होती.

मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे दर

दरम्यान मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम विक्रीचे दर हे 46 हजार 970 इतके आहे. तर हेच 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅमचे दर 47 हजार 970 इतके आहेत. पुण्यात 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा 46 हजार 190 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेटचा दर 49 हजार 460 रुपये इतका आहे.