मुंबईच्या 'प्रभादेवी'तल्या एका घराची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल

समुद्र किनाऱ्याच्या जवळ असलेलं तीन मजल्याचं हे आलीशान घर

Updated: Oct 26, 2018, 10:10 AM IST
मुंबईच्या 'प्रभादेवी'तल्या एका घराची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : मध्य मुंबईत एक घर चक्क १२७.४९ कोटी रुपयांना विकलं गेलंय. प्रभादेवी भागातील २५-साऊथ नावाच्या इमारतीमधील घराला ही किंमत मिळालीय. या घराचं क्षेत्रपळ २० हजार ९८९ चौरस फूट इतकं आहे. राजेश मंडवेवाला यांनी हे घर खरेदी केलंय. ते एका कंपनीचे संचालक आहेत. 

समुद्र किनाऱ्याच्या जवळ असलेलं तीन मजल्याचं त्यांचं हे आलीशान घर आहे. या घरासह त्यांना १४ गाड्यांचं पार्किंगही देण्यात आलंय. 

घराची नोंदणी करताना त्यांनी ६.३७ कोटींची मुद्रांक शुल्क भरलं. मुद्रांक आणि वस्तू सेवाकर मिळून या आलिशान घराची किंमत दीडशे कोटींच्या घरात गेलीय.

२५-साउथ इमारतीचा संपूर्ण प्रकल्प ५ एकरात पसरलेला असून २०२३ पर्यंत हा प्रकल्प पू्र्ण होणार आहे. वाधवा समूह आणि हबटाऊन मिळून या प्रकल्पाचं काम पूर्ण करत आहेत. 

'वेलस्पन इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक राजेश मंडवेवाला यांनी ४५, ४६ आणि ४७ व्या मजल्यावर तीन मजल्यांचं हे घरं खरेदी केलंय.