किरिट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे; मुश्रीफ एकूण 150 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार

भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी मुश्रीफांवर केलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले. 

Updated: Sep 20, 2021, 11:30 AM IST
किरिट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे; मुश्रीफ एकूण 150 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार title=

मुंबई :  किरिट सोमय्या जे आरोप करीत आहेत. त्यामागे भारतीय जनता पक्षाचं मोठं षडयंत्र आहे. आणि या षडयंत्राचे मास्टर माइंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. मुश्रीफ यांनी भाजप नेते किरिट सोमय्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

'मी सातत्याने महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ, आमचे नेते शरद पवार साहेब यांच्या समर्थनार्थ तसेच केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराबद्दल आवाज उठवत असतो. त्यामुळे भाजपचे नेते मला कसं रोखता येईल त्याबद्दल प्रयत्न करीत होते. किरिट सोमय्या यांना यासंबधीचे टुल म्हणून भाजपने वापरले आहे. 

चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. परंतु त्यांच्याच जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला आहे. त्याला कारणीभूत मुश्रीफ आहेत. म्हणून त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. परंतु मी त्याला सपशेल नकार दिला. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत झाली असल्याने त्यांना आता पुढील 10 वर्षतरी कोणतेही यश मिळू शकत नाही. त्यामुळे हसन मुश्रीफला रोखण्यासाठी किरिट सोमय्यांच्या माध्यमातून षडयंत्र सुरू आहेत. असा आरोप  मुश्रीफ यांनी केला आहे. 

'चंद्रकांत पाटील यांनी पुरूषार्थप्रमाणे लढावं. कोणाचातरी वापर करून, बदनामी करून काही होणार नाही. आज त्यांनी पुन्हा दुसरा आरोप केला तो अतिशय बिनबुडाचा आहे. त्याबद्दल किरिट सोमय्यांनी माफी मागायला हवी. ब्रिक्स कंपनीशी माझ्या जावयाचा संबध नाही. ज्या कंपनीचे वर्किंग कॅपिटलच तेवढे नाही त्या कंपनीत 100 कोटीचा घोटाळा होणार कसा? असा सवाल मुश्रीफांनी उपस्थित केला तसेच, आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना शासनाने 2012-13 ला ब्रिक्स कंपनीला 10 वर्षांसाठी चालवण्यास दिला होता. 2020 साली ब्रिक्स  कंपनीने कारखान्याचे कामगाज सोडले होते. तसेच ही कंपनी बनावट कंपनी नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे किरिट सोमय्यावर 100 कोटींचा पहिला आणि 50 कोटींचा दुसरा अब्रुनुकसानीचा दावा मी करणार आहे. किरिट सोमय्यांनी घोटाळेबाज, भ्रष्टाचारी अशा बदनामीकारक शब्दांचा वापर केला आहे. त्याविरोधातही आम्ही न्यायालयात जाणार आहोत. असा इशारा मुश्रीफ यांनी दिला.