मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील तिसऱ्यांदा विजयी

लोकभारतीचे कपिल पाटील तिसऱ्यांदा आमदार

Updated: Jun 28, 2018, 07:27 PM IST
मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील तिसऱ्यांदा विजयी title=

मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे कपिल पाटील यांनी लागोपाठ तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेचे शिवाजी शेंडगे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार अनिल देशमुख यांचा पराभव केला. तर मुंबई आणि कोकण पदवीधर निवडणुकीची मतमोजणी अजून सुरु आहे. मुंबई पदवीधरमधून शिवसेनेचे विलास पोतनीस आघाडीवर आहेत. याठिकाणी भाजपचे अमितकुमार मेहता, स्वाभिमानचे राजू बंडगर, तर अपक्ष दीपक पवार हे उमेदवार रिंगणात आहेत.

कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे यांनी अगदी अल्पशी आघाडी घेतलीय.. त्याठिकाणी राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला, तर शिवसेनेकडून संजय मोरे रिंगणात आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किशोर दराडे आघाडीवर आहेत. भाजपचे अनिकेत पाटील, राष्ट्रवादीतर्फे संदीप त्र्यंबक बेडसे आणि प्रतापदादा सोनावणे हे इथं रिंगणात आहेत.