वन अबव्हचा तिसरा मालक अभिजित मानकरला अटक

 इतर दोन आरोपींना रात्री अटक केल्यानंतर आज सकाळी अभिजित मानकरला पोलिसांनी अटक केली आहे. 

Updated: Jan 11, 2018, 08:24 AM IST
वन अबव्हचा तिसरा मालक अभिजित मानकरला अटक  title=

मुंबई : कमला मिल अग्नितांडवप्रकरणी मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.  वन अबव्हचा तिसरा मालक पोलिसांच्या हाती सापडला आहे.

अभिजीत मानकरला अटक 

 इतर दोन आरोपींना रात्री अटक केल्यानंतर आज सकाळी अभिजित मानकरला पोलिसांनी अटक केली आहे. 

तिसरा मालक 

अभिजित हा वन अबव्हचा तिसरा मालक आहे. कमला मिल येथे लागलेल्या आगीमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. यातील ३ मुख्य आरोपींचा शोध पोलीस घेत होते.

या आरोपींची माहिती देणाऱ्यास १ लाखाचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. दरम्यान हे तिनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.