'आव्हाडांनी त्याला मारलं ते चांगलंच केलं, विकृती ठेचलीच पाहिजे'

सोशल मीडिया हे विकृतीचे साधन नव्हे. 

Updated: Apr 8, 2020, 04:23 PM IST
'आव्हाडांनी त्याला मारलं ते चांगलंच केलं, विकृती ठेचलीच पाहिजे' title=

मुंबई: सोशल मीडियावरून आक्षेपार्ह टीका केल्यामुळे अभियंत्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून वादात सापडलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांच्या मदतीसाठी मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे या पुढे सरसावल्या आहेत. सोशल मीडिया हे विकृतीचे साधन नव्हे. त्यामुळे आव्हाडांनी विकृत पोस्ट करणाऱ्याला मारले असेल तर ते चांगलेच केले. विकृती ही ठेचलीच पाहिजे, असे रुपाली ठोंबरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 

मात्र, त्याचवेळी मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मात्र आव्हाडांवर टीका केली आहे. सोशल मीडियावरील मत पटलं नाही म्हणून ठाण्यातील अनंत करमुसे यांना अमानुष मारहाण करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा धिक्कार करणे गरजेचे आहे.  संचारबंदीच्या काळात हे कृत्य केल्यामुळे मग्रूर आव्हाडच्या चेहऱ्यावरचा संविधानाचा बुरखा फाटला आहे, अशी टीका कीर्तिकुमार शिंदे यांनी केली. 

' जितेंद्र आव्हाड, तुमचा दाभोलकर करू'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिल रोजी केलेल्या दीपप्रज्वलनाच्या आवाहनावर आव्हाड यांनी टीका केली होती. यानंतर सिव्हिल इंजिनीअर अनंत करमुसे (४०, रा. आनंदनगर, घोडबंदर रोड) यांनी आव्हाड यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. त्यामुळे अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, आव्हाड यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 
५ एप्रिलला दिवसभर मी विभागात फिरत होतो. यानंतर रात्री मी घरी येऊन झोपलो. मला या प्रकाराविषयी काहीही माहिती नाही, असे आव्हाड यांनी सांगितले.