मयुरच्या धाडसाचे कौतुक! जावा कंपनीकडून बाईक भेट

कर्जत-कल्याण रेल्वेमार्गावर मयुर शेळके या पाईंटमनने एका अंध महिलेच्या मुलाचे प्राण वाचवले होते.

Updated: Apr 24, 2021, 01:20 PM IST
मयुरच्या धाडसाचे कौतुक! जावा कंपनीकडून बाईक भेट title=

मुंबई :  काही दिवसांपूर्वी कर्जत-कल्याण रेल्वेमार्गावर मयुर शेळके या पाईंटमनने एका अंध महिलेच्या मुलाचे प्राण वाचवले होते. त्याचा थरारक व्हिडिओ सोशलमीडियावर तुफान व्हायरल झाला होता. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनीही त्याची दखल घेतली होती.  मयुरच्या या जिगरबाज कामगिरीमुळे जावा कंपनीने त्याला बाईक भेट दिली. आणि त्याच्या कामाचे कौतुक केले आहे.

मयुरने दाखवलेल्या बहादुरीमुळे जावा कंपनीचे फाऊंडर अनुपम थरेजा यांनी मयुरला सन्मानित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांना ब्रँड न्यू जावा फोर्टी टू बाईक गिफ्ट दिली आहे. तसेच मध्य रेल्वेनेदेखील मयुरच्या बहाद्दुरीचे कौतुक करत 50 हजार रुपये रोख रिवॉर्ड दिला आहे.

मयूरने त्या दिवशी  दाखवलेल्या धाडसा बद्दल रेल्वे बोर्डाकडून त्याला पन्नास हजार रुपयाचे बक्षीस जाहीर झाले आहे.मात्र या मिळणाऱ्या रकमेतील पंचवीस हजार रुपये मयुरने त्या अंध मातेला देण्याचे जाहीर केले आहे . मयूरच्या या निर्णयाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे