तेजस एक्स्प्रेसमधील विषबाधा प्रकरणी IRCTCने केला अजब खुलासा

प्रवाशांच्या एका ग्रुपने त्यांच्याकडचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने ही विषबाधा झाला असा अजब खुलासा आयआरसीटीसीने केलाय

Updated: Oct 16, 2017, 11:31 PM IST
तेजस एक्स्प्रेसमधील विषबाधा प्रकरणी IRCTCने केला अजब खुलासा title=

मुंबई : तेजस एक्स्प्रेसमधील अन्नातून विषबाधा प्रकरणी IRCTC ने हात झटकले आहेत. आम्ही दिलेल्या खाद्यपदार्थात काहीच अडचण नव्हती. मात्र, प्रवाशांच्या एका ग्रुपने त्यांच्याकडचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने ही विषबाधा झाला असा अजब खुलासा आयआरसीटीसीने केलाय.

तेजस एक्स्प्रेसमधील अन्नातून विषबाधा प्रकरणी आयआरसीटीसीच्या दोन कर्मचा-यांचं निलंबन कण्यात आलंय. निलंबनाच्या कारवाईनंतर आयआरसीटीसीचा अजब न्याय पहायला मिळतोय. निलंबीत केलेल्या दोन कर्मचाऱ्यांची नावं मात्र देण्यात आलेली नाहीयेत.

तीन सदस्यीय अधिका-यांची तेजस एक्स्प्रेसमधल्या विषबाधेप्रकरणी नियुक्ती केली गेलीय. मडगावचा स्टेशन आँफिसर आणि तेजस एक्स्प्रेसचा कँटरिंग मॅनेजर यांना निलंबीत करण्यात आलंय. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत या दोन कर्मचा-यांना निलंबन करण्यात आलंय. आयआरसीटीसीच्या माहिती जनसंपर्क अधिका-यांनी ही माहिती दिली.

तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली होती. यात २६ प्रवाशांना विषबाधेचा त्रास झाला होता. त्यानंतर आयआरसीटीसीनं ही कारवाई केली.