ठाकरे सरकार: भव्य शपथविधी सोहळ्यासाठी या नेत्यांना आमंत्रण

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला कोणाकोणला आमंत्रण ?

Updated: Nov 27, 2019, 04:38 PM IST
ठाकरे सरकार: भव्य शपथविधी सोहळ्यासाठी या नेत्यांना आमंत्रण title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदा मुख्यमंत्री होणार आहे. त्य़ामुळे शिवसेनेकडून शपथविधी सोहळा ऐतिहासिक करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक मोठ्या नेत्यांना यासाठी आमंत्रण पाठवण्यात येणार आहे. ज्यामध्ये विविध राज्यांच्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. शिवाज पार्क येथे हा शपथविधी सोहळा होणार असून जवळपास ७० हजार खुर्च्या येथे लावण्यात येत आहेत. तसेच एका मोठ्या मंचावर जवळपास १०० जणांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. 

कोणकोणाला निमंत्रण 

१. राज ठाकरे, मनसे

२, ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

३. अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

४. चंद्रबाबू नायडू, टीडीपी अध्यक्ष , माजी मुख्यमंत्री

५. अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान

६. अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

७. एचडी देवेगौडा, माजी पंतप्रधान, जेडीएस अध्यक्ष

८. सोनिया गांधी, युपीए अध्यक्षा

९. प्रियंका गांधी, काँग्रेस नेत्या

१०. अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

११. भूपेश बघेल, मुख्यमंत्री, छत्तीसगड

१२. नीतीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार

१३. कॅप्टेन अमरिंदर सिंह, मुख्यमंत्री, पंजाब

१४. के सी आर, मुख्यमंत्री, तेलंगणा

१५. राहुल गांधी येणार की नाहीत याबाबत शंका आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार यांनी ही यादी फायनल केली आहे. 

मोदी-शहांना निमंत्रण देणार का?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी म्हटलं होतं की, 'शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना देखील आमंत्रण दिलं जाईल.' पण पक्षाकडून त्यांना निमंत्रण दिलं जाईल की नाही याबाबत सांगता येणार नाही.

गुरुवारी संध्याकाळी ६.४० मिनिटांनी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईच्या शिवाजी पार्क येथे हा शपथविधी होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी ज्या ठिकाणी मंच उभा केला जातो. त्याच ठिकाणी शपथविधीसाठीचा मंच उभा केला जाणार आहे.