महाराष्ट्रच्या ५१ पोलिसांचा सन्मान, ८ शौर्यपदकांसह ३ राष्ट्रपती पदकांचा समावेश

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली.

Updated: Aug 14, 2018, 02:19 PM IST
महाराष्ट्रच्या ५१ पोलिसांचा सन्मान, ८ शौर्यपदकांसह ३ राष्ट्रपती पदकांचा समावेश title=

मुंबई: महाराष्ट्रातल्या ५१ पोलिसांना विविधं सेवा पदकं जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली. यामध्ये ८ शौर्यपदकं, ३ राष्ट्रपती विशेष सेवा पदकं, ४० अतुलनीय कामगिरी पदकं यांचा समावेष आहे. 

सुमारे ५१ पोलिसांचा समावेश

विविध पदकांसाठी महाराष्ट्रातील सुमारे ५१ पोलिसांचा समावेश झाला आहे. या पदकांमध्ये ८ शौर्यपदकं तर, ३ राष्ट्रपती विशेष सेवा पदकांचा समावेश आहे.

अतुलनीय कामगिरीसाठी ४० पदकंही प्रदान

दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांना अतुलनीय कामगिरीसाठी ४० पदकंही प्रदान करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली.