दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : आयआयटीमध्ये प्रवेश देण्यासाठी घेतल्या गेलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत देशात मुंबईचा कार्तिकेय गुप्ता पहिला आला आहे. त्याला ३७२ पैकी ३४६ गुण मिळाले आहेत. तर शबनम सहाय ही मुलींमध्ये पहिली आली आहे. जेईईच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. २ लाख ४५ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. आयआयटी जेईई ही देशपातळीवर घेतली जाते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
जेईई मेन्सचा कट-ऑफ यंदा वाढलेला दिसतो आहे. यंदा पहिल्यांदाच जानेवारी आणि एप्रिल अशा दोन वेळा झालेल्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेले २ लाख २४ हजार विद्यार्थी अॅडव्हान्ससाठी पात्र ठरणार आहेत. या वर्षी खुला गट (८९.७५), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (७८.२१), इतर मागासवर्गीय (७४.३१), अनुसूचित जाती (५४.०१), अनुसूचित जमाती (४४.३३) असा कट-ऑफ असल्याचे एनटीएने जाहीर केले आहे.
सोशल मीडियापासून लांब राहून यशस्वी होऊ शकतो असं कार्तिकेय गुप्ता याने म्हटलं आहे.