बंडखोर आमदारांचं निलंबन झालं तर सरकार पडणार का? जाणून घ्या बहुमताचं गणित

एकनाथ शिंदे सरकारची उद्या अग्नीपरीक्षा. बहुमत सिद्ध करणार?

Updated: Jul 3, 2022, 09:23 PM IST
बंडखोर आमदारांचं निलंबन झालं तर सरकार पडणार का? जाणून घ्या बहुमताचं गणित title=

मुंबई : महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आज पहिला मोठा विजय मिळवला. रविवारी महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली, त्यात शिंदे गट आणि भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले. 

सोमवारी फ्लोर टेस्टमध्ये एकनाथ शिंदे यांना आपली ताकद सिद्ध करायची आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासाठी फ्लोअर टेस्टचा रस्ता सोपा दिसत आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांना एकूण 164 मते मिळाली. महाराष्ट्र विधानसभेचे आकडे खूपच रंजक होते. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 असून, त्यापैकी एका आमदाराचे निधन झाले आहे. 39 बंडखोर सदस्यांना काढून टाकल्यानंतर एकूण सदस्य संख्या 248 होते, त्यानंतर जादूचा आकडा 125 होतो.

सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना 164 मते मिळाली आहेत. यापैकी 39 सदस्यांची मते वजा केली तरी हा आकडा 125 वर येतो. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मतदानात भाग न घेणारे पक्ष, सपा, एआयएमआयएम आणि सीपीएमचे आमदार आणि तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनीही उद्धव गटाच्या बाजूने मतदान केले तरी त्यांची संख्या 125 पर्यंत पोहोचत नाही.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या तीन डझनहून अधिक आमदारांनी उद्धव ठाकरे सरकारविरोधात बंड केले होते. प्रथम बंडखोर आमदार मुंबईहून सुरतला पोहोचले, त्यानंतर त्यांना सुरतहून गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर ते गुवाहाटीहून गोव्यात पोहोचले. दरम्यान, राज्यपालांनी फ्लोर टेस्ट घेण्याचे आदेश दिले होते. ज्याला उद्धव सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने फ्लोअर टेस्टला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.