राज्यात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट? काय म्हणाले आरोग्यमंत्री

महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात म्हणजेच कर्नाटक आणि गुजरातमध्येही ओमायक्रॉनचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारही सतर्क झाली आहे.

Updated: Dec 4, 2021, 06:03 PM IST
राज्यात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट? काय म्हणाले आरोग्यमंत्री title=

मुंबई : जगासह देशावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा चिंतेत वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात म्हणजेच कर्नाटक आणि गुजरातमध्येही ओमायक्रॉनचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्य सरकारही सतर्क झाली आहे. कोरोनाच्या या व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( if citizens do not take proper precautions the third wave of corona in the state could be caused by omecron says health minister rajesh tope )   

आरोग्यमंत्री काय म्हणाले?

"नागरिकांनी योग्य खबरदारी घेतली नाही, तर राज्यात कोरोनाची तिसरी लाट ही ओमायक्रॉनमुळे येऊ शकते, अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. पण घाबरण्याचं कारण नाही. नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करावे. तसेच लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं, असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. 

ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज

परदेशातून येणाऱ्यांसाठी पाच सूत्री एक्शन प्लॅन महापालिकेनं तयार केला आहे. धोकादायक देशांमधून येणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी हा एक्शन प्लॅन तयार केला आहे.

आफ्रिकन देशातून बंगळुरूत आलेले 10 जण गायब

दक्षिण आफ्रिकन राष्ट्रातून बंगळुरूत आलेले 10 जण गायब झाले आहेत. या 10 जणांचा थांगपत्ता नाही, त्यांचे मोबाईल बंद येत आहेत. 

कर्नाटकात दोन ओमायक्रॉनग्रस्त आढळले. त्यानंतरही या बेपर्वाईवर प्रचंड टीका होत आहे. आरोग्य अधिकारी या 10 जणांचा शोध घेत आहेत. कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून 57 जण आले होते. त्यातले 10 जण गायब झाल्याचं आढळलं आहे.