म्हाताऱ्या आईवडिलांना ज्योतिबा गेला, हे सांगायचं कसं?

एल्फिन्स्टनच्या चेंगराचेंगरीत जेएनपीटी येथे नोकरीला असलेला ज्योतिबा चव्हाण, या २९ वर्षीय तरुणाचा  मृत्यू झाला.

Updated: Sep 30, 2017, 10:18 PM IST
म्हाताऱ्या आईवडिलांना ज्योतिबा गेला, हे सांगायचं कसं? title=

मुंबई : एल्फिन्स्टनच्या चेंगराचेंगरीत जेएनपीटी येथे नोकरीला असलेला ज्योतिबा चव्हाण, या २९ वर्षीय तरुणाचा  मृत्यू झाला. परळला कागदपत्र आणण्यासाठी गेलेला ज्योतिबा घरी मुंब्य्रात परतलाच नाही. जोतिबा हा त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. घरात २ महिन्यांचे बाळ आणि ३ वर्षांची मुलगी आहे. जोतिबाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावरील छत्र हरपले आहे.

ज्योतिबा हा नवसाचा एकमेव मुलगा होता, घराचा एकमेव कमावता आधार होता, अखेर पोस्टमॉर्टमसाठी आणि मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रक्ताच्या नात्यातील जबाबदार व्यक्तीची गरज होती. तेव्हा म्हाताऱ्या आईवडिलांना लाडका एकुलता एक ज्योतिबा गेला कसा, हे सांगायचं कसं हा प्रश्न मित्रांना पडला होता.

अखेर ज्योतिबाच्या वडिलांना समजावून, हॉस्पिटलपर्यंत नेण्यात आलं, मृतदेह ताब्यात देण्यात आला, म्हाताऱ्या वडिलांनी तरूण मुलाचा मृतदेह नेण्यासारखं वाईट दृश्य पाहून ज्योतिबाचे मित्रही हळहळले.