मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई एटीएसचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येनं पोलीस दलात एकच खळबळ उडालीय. हिमांशू रॉय यांना कॅन्सर झाला होता. त्यांचा कॅन्सर बरा होत होता, पण त्यांना नैराश्याने ग्रासलं होतं... याच त्रासाला कंटाळून हिमांशू रॉय यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. उल्लेखनीय म्हणजे, काही महिन्यांपूर्वी घोड्यावरून पडल्यामुळेच त्यांना कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाल्याचं निदर्शनास आलं होतं... त्यानंतर ते क्वचितच मीडियात दिसले होते.
नेहमीप्रमाणे हॉर्स रायडिंगची आवड असलेले रॉय घोडसवारी करत होते... त्यावेळी अचानक ते घोड्यावरून खाली कोसळले... आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली... पहिल्यांदा त्यांनी आपल्या जखमेकडे दुर्लक्ष केले... पण, अनेक दिवस झाले तरी जखम भरून आली नाही... त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेत त्यांनी डायग्नोसिस टेस्ट केली... आणि डॉक्टरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली...
डॉक्टरांनी हिमांशू रॉय यांना कॅन्सरशी निगडीत काही टेस्ट करण्याचा सल्ला दिला... आणि या टेस्ट पॉझिटिव्ह निघाल्या. हिमांशू रॉय यांना बोन मॅरो कॅन्सर असल्याचं निदर्शनास आलं... त्यानंतर हिमांशू रॉय बरेच खचलेले दिसून आले. त्यांनी या दुर्धर आजाराला संपवण्यासाठी मुंबई, पुणे तसंच परदेशातही उपचार घेतले...
या दरम्यान हिमांशू रॉय मोठ्या सुट्टीवर होते... थोडं बरं वाटल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे जीमही जॉईन केलं. परंतु, काही दिवसानंतर कॅन्सरनं पुन्हा डोकं वर काढलं. त्यानंतर आलेल्या नैराश्यातच रॉय यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय.
हिमांशू रॉय यांची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागलीय. यामध्ये, 'माझ्या मृत्यूसाठी कुणीही जबाबदार नाही' असं त्यांनी लिहिलं असल्याचं महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय.
हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल केसेस धसास लावल्या होत्या. हिमांशू रॉय यांनी अनेक मोठ मोठे आणि गुंतागुंतीचे गुन्हे देखील बाहेर आणले. आयपीएल बेटिंग-ललीत मोदी प्रकरण, जेडे मर्डर केस हिमांशू रॉय यांनी उघड केली आहे. हिमांशू रॉय अनेक केसेस पर्सनली मॉनिटर करत होते. हिमांशू रॉय हे बॉडीबिल्डर ऑफिसर होते, शरीर यष्टीने अतिशय फिट असे हिमांशू रॉय होते, हिमांशू रॉय मागील एक दीड वर्षापासून मेडिकल लिव्हवर होते. हिमांशू रॉय आपल्या शेवटच्या काळात अतिशय विक होते, असंही सांगण्यात येत आहे. हिंमाशू रॉय यांनी तोंडात गोळी झाडली, त्यांना तात्काळ उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, पण त्यांचा मृत्यू झाला होता. हिमांशू रॉय यांना कॅन्सर झाला होता. त्यांचा कॅन्सर बरा होत होता, पण त्यांना नैराश्याने ग्रासलं होतं, असंही त्याच्या काही जवळच्या लोकांनी सांगितलं होतं. हिमांशू रॉय हे हाय प्रोफाईल केसेस उघड करण्याच्या बाबतीत नावारूपास आले होते.हिमांशू रॉय नाशिकला होते तेव्हा ते वादात देखील आले होते. पत्रकार जेडी हत्या प्रकरणाचा छडा वेगाने लावण्यात हिमांशू रॉय यांचा मोठा वाटा होता.