मुंबई: देशाच्या अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं अंग असूनही ट्रक चालकांकडे दुर्लक्ष केलं जातं. तणाव आणि थकवा देणारं हे काम असल्यानं अनेक ट्रक चालकांच्या प्रकृतीवर याचा परिणाम होतो. यातील अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी आणि निद्रानाश यासारखे विकार जडतात. या ट्रक चालकांच्या तब्येतीचा विचार करुन झी मीडियानं ट्रकचालकांसाठी कॅस्ट्रॉल प्रेझेंट ट्रक आसन, ही मोहीम सुरु केलीये.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झी मीडियानं बादी, हिमाचलप्रदेश मध्ये आपली ही मोहीम सुरु केलीये. या मोहिमेत ट्रक चालक सहभागी होणार आहेत.. कॅस्ट्रॉलनं ट्रक चालकांच्या तक्रारी जाणून त्यांचं निरसन करण्यासाठी स्पेशल फिटनेस रेजीम तयार केलाय... ज्याला ट्रक आसन असं नाव देण्यात आलंय.. यासाठी मुंबईतल्या सर्वात जुन्या योग सेंटरमधील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेण्यात आलंय.
या उपक्रमातून झी मीडिया ट्रक चालकांना फीट इंडिया मोहिमेत सहभागी करु पहातीये.. आणि यासाठी आम्ही योगाभ्यासाची मदत घेऊ इच्छितो.. कारण ट्रक चालक तंदुरुस्त तर भारताची अर्थव्यवस्था तंदुरुस्त.