मुंबईत वाऱ्यासह तुफान पाऊस, कोकणातही मुसळधार

सध्या दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस होत आहे. रस्ते जलमय झाले आहेत, अ

Updated: Aug 5, 2020, 04:23 PM IST
 मुंबईत वाऱ्यासह तुफान पाऊस, कोकणातही मुसळधार title=

मुंबई : मुंबई शहरात आणि उपनगरांत वाऱ्यासह तुफानी पाऊस होत आहे. मुंबईसाठी आणखी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. उत्तर कोकणताही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याची आहे. सध्या दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस होत आहे. रस्ते जलमय झाले आहेत, अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. 

मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये पाऊस होत आहे. दक्षिण मुंबईत जोरदार वाऱ्यासह पाऊस होत आहे. हवामान खात्याने आणखी २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होत आहे. 

रत्नागिरीतही नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. तिकडे कोल्हापूर-सिंधूदुर्ग मार्ग मुसळधार पावसाने ठप्प झाला आहे. पालघरमध्येही मुसळधार पाऊस होत आहे, वसई विरारमध्येही मागील २ दिवसापासून पाऊस सुरू आहे.

ठाणे जिल्ह्यात होणार पाऊस मुंबईची धरणं भरण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण मुंबईत यापूर्वी झालेल्या पावसाआधी अनेक दिवस पाऊस नव्हता. कोकणातही पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. महाड शहरात अजूनही पूरस्थिती कायम आहे. अनेक दिवसापासून पाण्याची प्रतिक्षा असलेल्या कोल्हापुरातही मुसळधार पाऊस होत आहे.