मुंबई : शहरासह (Mumbai Rain) आसपासच्या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे. अचानक आणि अवकाळी पावसामुळे सर्वसामन्यांची त्रेधातिरपीट उडाली. मुंबईसह नवी मुंबईतही जोरदार पाऊस पडतोय. दरम्यान पुढील 2 दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांसाठीही हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. (Heavy Rain fall in Mumbai and new mumbai 21 November 2021)
पुढील 4 तास या जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे
पुढचे 4 तास मुंबई, पालघर, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. तसेच राज्यात पुढील 2 दिवस विजांच्या गडगडाट आणि ढगांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचीही शक्यता वर्तवली आहे. मच्छिमारांनी मासेमारीसाठी पुढील 2 दिवस अरबी समुद्रात जावू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही उद्या पावसाचा अंदाज
दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यात ऐन थंडीतही पाऊस पडत असल्याने बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रातही उद्या (22 नोव्हेंबर) पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागांमध्ये उद्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.बीड, उस्मानाबाद भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यातील उपनगरात पाऊस झाला आहे.