ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम सुरू; हार्बर रेल्वेचा खोळंबा

सकाळीच ही घटना घडल्यानं हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा मात्र खोळंबा

Updated: Apr 24, 2019, 11:48 AM IST
ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम सुरू; हार्बर रेल्वेचा खोळंबा title=

मुंबई : बुधवारी सकाळीच हार्बर रेल्वे रखडली हार्बर रेल्वे मार्ग ठप्प झालीय. मानखुर्दजवळ पेन्टाग्राफ आणि ओव्हर हेड वायर तुटल्याने रेल्वे सेवा ठप्प झालीय. सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी ही घटना घडली. त्यामुळे सीएसटीहून पनवेलकडे जाणारी रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली. सकाळीच ही घटना घडल्यानं हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा मात्र खोळंबा झालाय.  

ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू आहे. याचा परिणाम म्हणून हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक दुपारी ११.३० वाजताही १० ते १५ मिनिटे उशिरानं सुरू आहे.