Mumbai Local travel : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

सर्वसामान्य प्रवाशांना लोकलने प्रवासासाठी मुभा देण्याची आमची तयारी असल्याचे रेल्वेने म्हटलंय. 

Updated: Nov 12, 2020, 07:26 PM IST
Mumbai Local travel : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी title=

मुंबई : शिक्षक (Teachers)आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना (non-teaching staff) लोकलने (Local Travel) प्रवास करण्याची मुभा एक ते दोन दिवसात मिळेल अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. काल दुपारी आम्हाला या बाबतच पत्र मिळालंय. सर्वसामान्य प्रवाशांना लोकलने प्रवासासाठी मुभा देण्याची आमची तयारी असल्याचे रेल्वेने म्हटलंय. 

आम्हाला राज्य सरकारच्या होकाराची आणि त्यांच्या सोबतच्या बैठकीची प्रतीक्षा असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारला जी माहिती हवी होती ती त्यांना आम्ही दिली आहे. आम्ही वेळोवेळी आमच्या सुविधांमध्ये वाढ केलीय. रेल्वे पूर्ण तयार आहे 

शिक्षकांच्या  लोकल प्रवासावरून आता राज्य सरकार (Maharashtra Government) आणि रेल्वेमध्ये (Railway) पुन्हा एकदा वाद (Dispute) निर्माण झाला आहे. शाळांमध्ये (School) ५० टक्के उपस्थिती आणि २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

यासंदर्भात राज्य सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची (Mumbai Local) मुभा देण्याची विनंती केली. मात्र राज्य सरकारचे पत्र उशिरा मिळाल्याचा दावा रेल्वेने केला आहे.

दरम्यान, नवरात्रीनिमित्त मुंबई आणि एमएमआर भागातल्या महिलांना लोकलमधून प्रवास करण्याबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले होते. मात्र,  रेल्वेने खोडा घातला होता. त्यावरुन वाद निर्माण झाला होता. रेल्वेने हात झटकले होते. रेल्वेने मात्र सेवा सुरू करण्यास असमर्थता दर्शवली. 

केंद्राची परवानगी आणि तयारी करण्यासाठी वेळ लागेल असे सांगत लोकल सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे पश्चिम रेल्वेने राज्य सरकारला पत्राद्वारे कळवले होते. त्यामुळे नवरात्री निमित्तानं राज्य सरकारने महिलांना दिलेल्या या विशेष भेटीवर विरजण पडले होते. त्यानंतर महिलांसाठी लोकल प्रवास खुला करण्यात आला. आता शाळा सुरु होणार असल्याने शिक्षकांना रेल्वेतून प्रवास करता यावा म्हणून राज्य सरकारने रेल्वेला पत्र पाठविले. मात्र, पुन्हा एकदा कारण देत राज्य सरकारकडेच बोट दाखवले आहे.