मुंबईत मुली हरवणे आणि अपहरणाचे प्रमाण वाढले 

मुंबईत गुन्हेगारी वाढतेय...

Updated: Jul 11, 2018, 10:18 AM IST
मुंबईत मुली हरवणे आणि अपहरणाचे प्रमाण वाढले  title=

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या पाच वर्षात मुली हरवण्याचे आणि अपहरणाचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत 2013 साली 18 वर्षाखाली हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलींची संख्या 92 होती. ती 2014 साली 1500 झाली तर 2017 साली 1368 होती. 2013 ते 2017 मध्ये 18 वर्षाखालील एकूण 5056 मुलींचे अपहरण आणि हरवल्याच्या घटना समोर आल्य़ा आहेत. त्यातील 4758 मुली सापडल्या तर अजूनही 370 मुली बेपत्ता आहेत.

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून हरवलेल्या/ अपहरण झालेल्या मुली

वर्ष       18 वर्षाखाली मुली         18 वर्षावरील महिला

           हरवलेले | सापडले          हरवलेले । सापडले

2013      92         79               4041       3823

2014    1500     1475             4170       3943

2015     927       878              4315       4039

2016    1169     1091             4527       4096

2017    1368    1235              4599       3785

एकूण     5056    4758            21652      19686

2013 ते 2017 या कालावधीत 18 वर्षाखाली मुला-मुलींचे भीक मागायला लावण्यासाठी अपहरण केल्याबाबत तीन गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी दोन गुन्ह्यात दोषसिद्ध झाले तर एक गुन्ह्यात आरोपीला दोषमुक्त करण्यात आलं. याच कालावधीत मुलींचा अनैतिक कृत्यासाठी वापर केल्याचे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत.