गणरायाच्या देखाव्यातून मांडली गिरणगावची संस्कृती....PHOTOS

बाप्पाच्या आगमनाचा थाटच न्यारा 

Updated: Sep 10, 2021, 11:26 AM IST
गणरायाच्या देखाव्यातून मांडली गिरणगावची संस्कृती....PHOTOS  title=

मुंबई : गणेशोत्सवावर कोरोनाच सावट असलं तरीही भाविकांचा उत्साह दाणगा आहे. घरोघरी बाप्पाचं आगमन झालं आहे. गणरायाच्या येण्याने मरगळ निघून गेली आहे. प्रत्येकजण परिस्थितीवर मात करत गणेशोत्सव साजरा करत आहे. आज गणपती उत्सव म्हटला की लोकांच्या समोर लालबाग - परळचा गणेश उत्सव आठवतो. पण हाच ' लालबाग -परळ एकेकाळी ' गिरणगाव ' म्हणून ओळखले जातं,  ’ गिरणगाव ' म्हणजे गिरण्यांचे गाव’. याच गिरणगावातील सुंदर देखावा आपल्या घरी भाविक पराग सावंतने साकारला आहे. 

मुंबईच्या आर्थिक राजधानीचा मान मिळाला तो याच गिरण्याच्या गिरणगावामुळेच. आज लालबाग परळ ज्या गणेशोत्सवाने गजबजून जाते, त्या उत्सवाचा गाभा हा आकाशाला भिडलेल्या अनेक गिरण्या आहेत .


मुंबईत पहिली गिरणी सुरू झाली आणि महाराष्ट्रसह देशातील विविध भागातून लोकं आली सोबत आपली संस्कृती ,आपली भाषा , आपली परंपरा देखील घेऊन आले त्यातुनच या गिरणगावातील हा गणेशोत्सव जगाच्या पाठीवर आपली छाप सोडून आहे.

ईथल्या चाळसंस्कृतीत दडलेला गणेशोत्सव फार विशेष आहे. आणि हीच संस्कृती या देखाव्यातून मांडली आहे. 


लोकमान्य टिळकांनी केशवजी चाळीत गणेशउत्सवाचा पाया रचला खर तर त्याला कळस चढविला तो गिरणगावात राबणाऱ्या हातांनीच ..


गेल्या काही वर्षात गिरणगावाचा चेहरामोहराच बदलला गेला , इथल्या गिरण्यांची जागा टोलेजंग टॉवर आणि मॉल्सने घेतली तर काही गिरण्या अजून इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.


आज जर याच गिरण्या चालू झाल्या तर खितपत पडलेले उंच भोंगे सुरू झाले तर ? गिरण्याच्या आवारात शाहिराची शाहिरी टाल ऐकू आली तर ? 


त्याच कष्टकरी हाताने हा उत्सव आज कसा साजरा झाला असता , याचे मनोभावे रूप कसे असते हेच मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न भाविक पराग सावंतने आपल्या देखाव्यातून केला आहे.