घाटकोपर दुर्घटना : 'ते' विमान शाळेवर पडले असते तर...

इथे साधारणपणे बाराशे विद्यार्थी शिक्षण घेतात..

Updated: Jun 29, 2018, 11:28 AM IST
 घाटकोपर दुर्घटना : 'ते' विमान शाळेवर पडले असते तर... title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया मुंबई : घाटकोपरध्ये विमान दुर्घटनेत मोठा अनर्थ टळलायं. ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं तिथून अगदी बाजूलाच माणिकलाल शाळा आणि मॅनेजमेंट कॉलेज आहे. इथे साधारणपणे बाराशे विद्यार्थी शिक्षण घेतात.... वैमानिक मारिया झुबेरी आणि प्रदीप राजपूत यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय.

प्रशिक्षणासाठी उड्डाण 

उड्डाण केल्याच्या काही वेळातच घाटकोपरमधल्या सर्वोदय रुग्णालयाजवळ हे विमान कोसळलं. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर हे विमान कोसळलं. एकेकाळी उत्तर प्रदेश सरकारचं असलेलं हे विमान २०१४ साली युवाय अॅव्हिएशनला विकण्यात आलं होतं. या विमानानं प्रशिक्षणासाठी उड्डाण केलं होतं. या अपघातात विमानातल्या चौघांसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

पाचजणांचा मृत्यू 

मुख्य वैमानिक प्रदीप राजपूत, महिला सहवैमानिक मारिया, विमान तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.  हे विमान रस्त्यावर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. विशेष म्हणजे विमान रस्त्यावर कोसळताना मागून एक चारचाकी वाहन येत होतं. मात्र या वाहनाचं नेमकं काय झालं याबाबत अजून तपशील मिळू शकलेला नाही. घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सी ९० जातीचं हे चार्टर्ड प्लेन होतं, दोन वैमानिक, दोन इंजिन असलेल्या या विमानानं जुहू विमानतळावरुन उड्डाण केलं होतं.