मुंबई : भाविक गेल्या कित्येक दिवसांपासून गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. अवघ्या दोन दिवसावर बाप्पाचं आगमन असताना मुर्ती प्रतिष्ठापना नेमकी कधी करायची? असा प्रश्न भाविकांमध्ये आहे.
त्याचप्रमाणे यंदा बाप्पा १२ दिवस विराजमान होणार आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजे २५ ऑगस्ट रोजी श्री गणेशाचे आगमन होणार आहे. गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पहाटे ४.३० म्हणजे ब्राह्ममुहूर्तापासून वाजल्यापासून दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे. तसेच प्रत्येक ज्योतिष शास्त्रानुसार प्रतिष्ठापनेची वेळ वेगवेगळी देण्यात आली आहे. मात्र अनेक जण २५ ऑगस्टरोजी सकाळीच बाप्पाची प्रतिष्ठापना करतील.
तसेच ज्योतिषाचार्य दत्तात्रय होस्केरे यांच्यानुसार १ सप्टेंबर रोजी भादौ माह शुक्ल पक्ष असून त्या दिवशी गणरायाचा जन्म झाला होता. शास्त्रात देखील असा उल्लेख आहे की गणरायाचा जन्म मध्यान्हात झाला होता. त्यामुळे आजच्या दिवशी ही प्रतिष्ठापना आपण ८ वाजून ३९ मिनिटांपासून ते ७ वाजून २ मिनिटांपर्यंत करू शकतो.
घरी गणेशमूर्ती आणण्यासाठी कोणताही मुहूर्त पहाण्याची जरूरी नाही. श्रीगणेशाची स्थापना व पूजन करण्यासाठी शुक्रवार दि. २५ आॅगस्ट रोजी प्रांत:कालपासून दुपारी मध्यान्ह समाप्तीपर्यंत म्हणजे दुपारी दोन वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभवेळ असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. यावर्षी पाचव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याच्या दिवशी मंगळवार येत आहे. तरी त्याच दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करावे. गणेशमूर्ती विसर्जनाचा आणि मंगळवारचा काहीही संबंध नसल्याचेही श्री. सोमण यांनी सांगितले.
या वर्षी श्री गणेशोत्सव बारा दिवसांचा आहे. येत्या गुरुवारी हरितालिका पूजन आहे. शुक्रवारी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनंतर भद्रा असली तरी, श्री गणेश स्थापना, प्राणप्रतिष्ठा आणि पूजन करण्यास ती वर्ज्य नाही. त्यामुळे शुक्रवारी ब्राह्ममुहूर्तापासून दुपारी १.४५ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने कोणत्याही वेळी श्रीगणेश पूजन करता येईल, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
दशमीची वृद्धी झाल्याने यंदा गणेशोत्सव बारा दिवसांचा असून, पाच सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे. त्या दिवशी मंगळवार असला तरी नेहमीप्रेमाणे गणेश विसर्जन करता येते. यापूर्वी २००८, २००९ आणि २०१०मध्ये सलग ती वर्षे गणेशोत्सव बारा दिवसांचा होता. आपल्या घरी जेवढे दिवस उत्सव तितके दिवस सकाळी पूजा आणि रात्री आरती, मंत्रपुष्पांजली म्हटल्याने केल्याने घरातील वातावरण प्रसन्न होते.