मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ED चा समन्स

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Updated: Jul 3, 2022, 08:40 PM IST
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ED चा समन्स title=

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने संजय पांडे यांना समन्स जारी केला आहे. मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात दिल्लीला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 5 जुलैला सकाळी साडे अकरा वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीने एनएसई सर्व्हर कंप्रोमाईज प्रकरणात समन्स पाठवला आहे. चित्र रामकृष्ण प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती. ही कंपनी संजय पांडे यांची होती. 

संजय पांडे तीन दिवसांपूर्वी म्हणजेच 30 जून रोजी निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी बुधवारी 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या समन्सनंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारची कारवाई चुकीची असल्याचं मत, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. 

कोण आहेत संजय पांडे?
सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त असलेले संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती.