मुंबई : आयसीआयसीआई बॅंकेने माजी पेट्रोलियम सचिव गिरीशचंद्र चतुर्वेदी यांना गैर कार्यकारी चेअरमन म्हणून नियुक्त केले आहे. आयसीआयसीआई बॅंकेने शुक्रवारी ही माहिती दिली. आयसीआयसीआय बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, एम. के. शर्मा यांचा कार्यकाळ ३० जून, २०१८ रोजी संपत आहे. १ जुलै २०१८ पासून तीन वर्षांसाठी चतुर्वेदी यांची नियुक्ती प्रभावी ठरणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाने गिरीशचंद्र चतुर्वेदी यांना १ जुलैपासून अंशकालिक गैर-कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
गिरीशचंद्र चतुर्वेदी यांची ही नियुक्ती संचालक मंडळाने दूरदृष्टीने केली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या आधीच्या सीईओ चंदा कोचर यांच्यावर कुटुंबीयांना झुकते मात देऊन कर्ज दिल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर त्यांना पदावरुन हटविण्यात आले होते. तसेच त्यांची चौकशी सुरु करण्यात आलेय. बँकेने याआधी या महिन्याच्या सुरुवातीला अशी घोषणा केली होती की, चंदा कोचर यांची या प्रकरणात अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याआधी बँकेने १९ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बक्षी (सीओओ) बनविले होते. बँकेने असेही सांगितले की, व्हिडीओकॉन कर्जाच्या प्रकरणांत अंतर्गत तपासणी पूर्ण होईपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर त्या सुट्टीवर असणार आहेत. यापूर्वी संदीप बक्षी हे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्श्युरन्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होते.