पाम बीचमार्गावर भीषण आग

घटनास्थळी ४ अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल  

Updated: Feb 8, 2020, 08:39 AM IST
पाम बीचमार्गावर भीषण आग title=

नवी मुंबई : पाम बीच मार्गावर टॉवरला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी ४ अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अचानक आग लागल्यामुळे टॉवर मधील लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. टॉवरच्या २०व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. त्यामधील २ घरांना जास्त आग लागली आहे. आग लागल्याचे कारण  मात्र अद्याप अस्पष्ट आहे. 

त्याचप्रमाणे, मुंबईतल्या काळाचौकी परिसरातील अभ्युदय नगरच्या मिलान इंडस्ट्रीयल इस्टेट इथं मध्य रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दालाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक परिश्रमानंतर आगिवर नियंत्रण मिळवण्यात आग्निशमन दलाला यश आलंय. यात कोणतीही जीवितीहानी झाली नसून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोऱ आलीय.