साकिनाक्यात गोडाऊनला भीषण आग

मुंबईच्या साकिनाका भागातील शीतल नगर परिसरातील गोडाऊन ला रात्री ११.३० वाजल्याच्या सुमारास भीषण आग लागली. 

Updated: Mar 3, 2018, 09:15 AM IST
साकिनाक्यात गोडाऊनला भीषण आग title=

मुंबई : मुंबईच्या साकिनाका भागातील शीतल नगर परिसरातील गोडाऊन ला रात्री ११.३० वाजल्याच्या सुमारास भीषण आग लागली. 

या आगीत शीतल नगर येथे असलेले गारमेंट कारखाने आणि केमिकल कारखाने इतर गोडाऊन जाळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की या आगीचे लोट फार दूर वरून दिसत होते.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा टँकर प्रयत्न करीत होते... तर या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली? याचा शोध साकिनाका पोलीस आणि अग्निशमन दल घेत आहे.

दरम्यान, याच ठिकाणच्या गोडाऊनला अनेकदा यापूर्वीही आग लागली होती. त्यामुळे या गोडाऊन मालकाकडे अग्निशमन दलाचा परवाना होता का? आणि परवाना असल्यास अग्निशमन यंत्रणा होती का? असे सवाल निर्माण झाले आहेत.

याअगोदर खैराणी रोड इतल्या भानू फरसाण मार्टला आग लागली होती. त्यात १२ मजुरांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर महापालिका जागी झाली होती आणि काही ठिकाणी कारवाई करीत होती. मग या गोडाऊनवर लक्ष का गेले नाही? असा सवाल नागरिक विचारत आहेत.